चोम्स्कींचा भाषाविचार
आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या …